YASHADA Logo

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा)

महाराष्ट्र शासनाचे शिखर प्रशिक्षण संस्था

राजभवन आवार,सकाळनगर जवळ, बाणेर रोड, गणेशखिंड, पुणे, महाराष्ट्र 411007

यशदा गीत लेखन स्पर्धा 2025

गीत सादर करण्यासाठी येथे क्लिक करा

नियम व अटी

  1. यशदा गीतलेखनाची स्पर्धा ही महाराष्ट्रातील रहिवासी व्यक्तींसाठी खुली असेल.
  2. एक व्यक्ती एकच प्रवेशिका पाठवू शकतो. जर एकाच व्यक्तीच्या एकाहून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या तर त्या व्यक्तीचा स्पर्धेतील प्रवेश रद्द समजला जाईल.
  3. गीतलेखन करताना यशदाची ध्येय, उद्दिष्टे आणि कार्य लक्षात घेणे आवश्यक आहे. (यशदा अर्थात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी ही पुणे स्थित महाराष्ट्र शासनाची शिखर प्रशिक्षण संस्था आहे.)
  4. यशदासाठीचे गीत हे केवळ मराठी भाषेतच सादर करणे अपेक्षित आहे.
  5. यशदासाठी गीत सादर करताना ते केवळ ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावे. इतर कोणत्याही स्वरुपात आलेले गीत स्वीकारले जाणार नाही.
  6. आपले गीत २६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावे. त्यानंतर आलेले गीत ग्राह्य धरले जाणार नाही.
  7. सहभागी प्रत्येक व्यक्तीस सहभाग प्रमाणपत्र (ऑनलाईन, डिजीटल स्वरुपात) देण्यात येईल.
  8. विजेत्या एका व्यक्तीस रुपये ११,०००/- (अक्षरी रुपये अकरा हजार रुपये केवळ) एवढे पारितोषिक देण्यात येईल.
  9. या स्पर्धेसाठी सादर केलेले गीत इतर कुठेही आणि कोणत्याही स्वरूपात प्रकाशित झालेले नसावे.
  10. आपण सादर केलेल्या गीताला संगीत दिल्यानंतर ते संपूर्ण गीत एका मिनिटांपेक्षा कमी कालावधीमध्ये सादर करता येईल, अशाच पद्धतीने शब्दसंख्या आणि इतर तांत्रिक बाबी असणे अपेक्षित आहे.
  11. गीतासोबत आवश्यक ती सर्व माहिती पुरविली नसल्यास प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.
  12. स्पर्धेसाठी कोणतेही कारण न देता गीत स्वीकारण्याचे अथवा नाकारण्याचे सर्वाधिकार यशदाने राखून ठेवले आहेत.
  13. गीत निवड समितीचा निर्णय सर्वांवर बंधनकारक असेल. तसेच घेतलेल्या निर्णयाबाबत कोणत्याही सहभागींना किंवा इतर कोणालाही कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिले जाणार नाही.
  14. विजेत्या स्पर्धकाला यशदामार्फत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. त्याबाबत इतर कोणत्याही प्रकारचा संपर्क स्पर्धकांसोबत केला जाणार नाही.
  15. विजेत्यांची निवड ही यशदाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  16. गीत मराठी भाषेत असले तरी ते सुगम, प्रेरणादायी आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत असावे.
  17. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
  18. गीताची लांबी १२ ते १६ ओळींपर्यंत असावी, आणि त्यात मुखडा व अंतरे स्पष्ट असावीत.
  19. सादर केलेले गीत हे वृत्तबद्ध असावे. ज्यामुळे या गीताला संगीत दिल्यानंतर ते गेय स्वरुपात निर्माण करता येईल.
  20. गीतात कोणत्याही प्रकारची राजकीय, धार्मिक, सामाजिक द्वेषभावना निर्माण करणारी भाषा वापरलेली नसावी. कोणतेही आक्षेपार्ह्य, असंसदीय शब्द असू नयेत.
  21. गीत नवीन (original) असावे; कोणत्याही इतर व्यक्तीच्या काव्याचा, गीताचा, किंवा कल्पनेचा वापर केल्यास प्रवेशिका अपात्र ठरेल.
  22. गीत टंकलिखित (typed) स्वरूपात सादर करणे प्राधान्याने अपेक्षित आहे. हस्तलिखित गीत असल्यास अक्षर वाचनीय असावे. गीत लिहिलेल्या हस्तलिखिताचा चांगल्या वाचनीय स्वरुपात फोटो काढून सादर करता येईल.
  23. गीतासोबत ऑनलाईन फॉममध्ये दिलेली सर्व माहिती देणे आवश्यक आहे.
  24. गीताची निवड झाल्यानंतर त्यावरील सर्व कॉपीराइट आणि प्रकाशन अधिकार यशदाकडे राहतील.
  25. स्पर्धकाने गीत सादर करताना स्वतःची मूळ निर्मिती असल्याची खात्री द्यावी.
  26. निवड समितीने आवश्यक असल्यास गीतात सुधारणा करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
  27. स्पर्धेशी संबंधित सर्व बाबींवरील अंतिम निर्णय यशदाचा असेल आणि तो सर्व सहभागी स्पर्धकांवर बंधनकारक राहील.
  28. विजेत्या गीताचा वापर यशदाच्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये, प्रचार साहित्यामध्ये किंवा ध्वनीफितीमध्ये करण्यात येऊ शकतो.
  29. या स्पर्धेचे नियम व अटी बदलण्याचा अधिकार यशदाने राखून ठेवले आहेत.
  30. स्पर्धकाने सादर केलेल्या गीतावर कोणत्याही प्रकारचे कायदेशीर आव्हान देण्यात आले, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही गीतलेखकाची असेल. त्याच्याशी यशदाचा काहीही संबंध असणार नाही.
  31. केवळ वरील नियमांशिवाय आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही अडचण असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

संपर्क:

डॉ. किरण धांडे
(प्रभारी अधिकारी (प्रकाशन) तथा सहाय्यक प्राध्यापक, यशदा, पुणे)
मो. +91 96652 46198

व्यंकटेश कल्याणकर
(प्रकल्प संशोधक, यशदा, पुणे)
मो. +91 77987 03952

गीत सादर करण्यासाठी येथे क्लिक करा